बस दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू

बस दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू

उत्तरकाशीत बस दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस व बचाव पथक प्रवाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे.

मध्य प्रदेशच्या ४० यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. हे सर्व यात्रेकरू मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील आहेत. ही घटना यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर डामटा येथे घडली. आतापर्यंत १६ जणांचे मृतदेह काढण्यात यश मिळाले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस व राज्य आपत्कालीन पथकाने बचाव व मदतकार्य सुरू केले आहे.

हरिद्वार येथून निघालेल्या बसमध्ये २८ जण बसू शकतात; मात्र त्यात ४० जण प्रवास करत होते. या दुर्घटनेत बचावलेले उदय सिंह व त्यांची पत्नी हकी राजा यांना रुग्णालयात दाखल केले. ही बस दरीत कोसळताना दिसताच प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. बसचे छप्पर उडाले. जमिनीवर मृतदेह पाहताच अनेक जण घाबरले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in