५० लाख टन गहू, २५ लाख टन तांदळाची विक्री खुल्या बाजारात करणार

वाढत्या किंमतीना आळा घालायला केंद्राचा निर्णय
५० लाख टन गहू, २५ लाख टन  तांदळाची विक्री खुल्या बाजारात करणार
Published on

नवी दिल्ली : देशात गहू व तांदळाच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका बसू लागला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ५० लाख टन गहू व २५ लाख तांदळाची विक्री खुल्या बाजारात करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजीव चोपडा यांनी केली. आपल्या गोदामातील गहू व तांदूळ सरकार विक्रीस काढणार आहे.

१ ऑगस्टला सरकारच्या गोदामात २८.३ दशलक्ष मेट्रिक टन गव्हाचा साठा होता. गेल्यावर्षी तो २६.६ दशलक्ष मेट्रिक टन गव्हाचा साठा होता. देशात अन्नधान्याच्या किंमती रोज वाढत आहेत. त्यामुळे याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी होत होती. सरकारने तांदळाच्या निर्यातीवर बंद घातली. त्यामुळे तांदळाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवता येऊ शकेल. तसेच देशातील तांदळाचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

निवडणुकांमध्ये महागाईचा मुद्दा उपस्थित होणार

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका व यंदा होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता सरकारला महागाईच्या मुद्यावर ठोस पावले उचलणे गरजेचे बनले आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने महागाईचा आगडोंब उसळल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरकारने स्वस्त दरात टोमॅटो विकायला सुरुवात केली.

logo
marathi.freepressjournal.in