रायपूर येथे पार्किंगमध्ये असलेल्या बांगलादेशी विमानाची होणार विक्री

तीन विमानतळ संचालक बदलूनही हे विमान अद्याप रायपूरहून बांगलादेशला रवाना झालेले नाही
रायपूर येथे पार्किंगमध्ये असलेल्या बांगलादेशी विमानाची होणार विक्री

ढाकाहून मस्कतला जाणारे बांगलादेशी एअरलाइन्सचे विमान रायपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर जवळपास सात वर्षापासून रायपूर विमानतळावर उभे आहे. तीन विमानतळ संचालक बदलूनही हे विमान अद्याप रायपूरहून बांगलादेशला रवाना झालेले नाही. विमानाची किंमत सुमारे १८०कोटी रुपये आहे.

दोन डझनहून अधिक ई-मेल केल्यानंतर आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या दबावानंतर आता या परदेशी विमान कंपनीने केंद्रीय आणि रायपूर विमानतळ प्राधिकरणाला विमान विकल्यानंतर विमानतळावरील पार्किंग आणि इतर शुल्क भरले जाईल, असे आश्वासन दिले आहे. या विमानाची विक्री करण्यासाठी लवकरच जागतिक ऑनलाइन निविदा काढण्यात येणार आहे.

यानंतर जो कोणी विमान विकत घेईल तोच, ते घेऊन जाईल. ७ ऑगस्ट २०१५ रोजी ढाकाहून मस्कतला जाणाऱ्या या विमानाचे इंजिन निकामी झाले होते. त्यात १७३ प्रवासी होते. रायपूरपासून ९० किमी अंतरावर असलेल्या बेमेटारामध्ये आगीमुळे इंजिनचा काही भाग निकामी होऊन शेतात पडला होता.

युनायटेड एअरवेज कंपनी बांगलादेशला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतरच कंपनीच्या वतीने विमान विक्रीची माहिती देण्यात आली आहे. सात वर्षांत पार्किंगसह इतर शुल्क २.२५कोटींहून अधिक झाले आहे. हे विमान युनायटेड एअरवेज ऑफ बांगलादेशचे एमडी-८३ आहे.बाजारात या नवीन विमानाची किंमत १८० कोटींहून अधिक आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in