मंकीपॉक्सच्या वाढत्या उद्रेकामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसस यांनी हा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारचा निर्णय प्रथमच घेण्यात आला
मंकीपॉक्सच्या वाढत्या उद्रेकामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्सच्या वाढत्या उद्रेकामुळे या साथीबद्दल चिंता व्यक्त करीत ‘जागतिक आरोग्य आणीबाणी’ जाहीर केली आहे. मंकीपॉक्सचा ७० हून अधिक देशांमध्ये फैलाव झाल्याने डब्ल्यूएचओने आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या आणीबाणी समितीमध्ये मंकीपॉक्सप्रकरणी जागतिक आणीबाणी जाहीर करण्याबाबत एकमत झाले नसले, तरी ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसस यांनी हा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारचा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे.

अमेरिकेत दोन मुलांना मंकीपॉक्सची लागण

अमेरिकेत प्रथमच दोन मुलांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. रोग नियंत्रण व प्रतिबंध आरोग्य यंत्रणेच्या (सीडीसी) माहितीनुसार, एक संक्रमित मूल कॅलिफोर्नियाचे असून दुसरे नवजात मूल परदेशातील आहे. मंकीपॉक्स आतापर्यंत जगभरातील ८० देशांत पसरला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in