राहुल गांधींची ED चौकशी सुरू असताना कार्यकर्ते आक्रमक, टायर पेटवले

पोलिसांनी शेकडो आंदोलकांना ट्रकमधून हुसकावून लावले. काँग्रेसच्या काही नेत्यांना त्यांच्या घरात कैद करण्यात आल्याचेही कळते
राहुल गांधींची ED चौकशी सुरू असताना कार्यकर्ते आक्रमक, टायर पेटवले
Rahul GandhiANI

नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी ईडीने (ED) मंगळवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची दहा तास चौकशी केली. राहुल गांधी यांना बुधवारी पुन्हा समन्स बजावल्याने, संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी शेकडो कर्मचारी ईडी कार्यालयाबाहेर जमले आणि टायर जाळून त्यांनी निषेध व्यक्त केला. या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे काही नेते आणि पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे.

काँग्रेसच्या कार्यवाहक अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 13 जून रोजी ईडीने त्याला दिल्ली ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. 13 जून आणि 14 जून रोजी चौकशी केल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधींना समन्स बजावण्यात आले आहे.

ईडी कार्यालयात राहुल गांधी यांची चौकशी सुरू असताना बाहेर टायर जाळण्यात आले. शुक्रवारी झालेल्या रॅलीत पोलिसांनी शेकडो आंदोलकांना ट्रकमधून हुसकावून लावले. काँग्रेसच्या काही नेत्यांना त्यांच्या घरात कैद करण्यात आल्याचेही कळते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in