अदानी समूहाने केला हेल्थकेअर क्षेत्रात प्रवेश

अदानी समूहाने केला हेल्थकेअर क्षेत्रात प्रवेश

अब्जाधीश गौतम अदानी यांच्या समूहाने नवी कंपनी स्थापन करुन हेल्थकेअर क्षेत्रात प्रवेश केला आहे. नवी कंपनी मोठी हॉस्पिटल्स, डायग्नॉस्टिक्स चेन्स, ऑफलाईन आणि डिजिटल फार्मसीज ताब्यात घेणार आहे.

अदानी एन्टरप्रायजेस लि.ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, संपूर्ण मालकीची उपकंपनी अदानी हेल्थ व्हेंचर्स लि. (एएचव्हीएल) १७ मे २०२२ रोजी स्थापन करण्यात आली. ही कंपनी आरोग्य क्षेत्राशी संबंधित व्यवसायाला लवकरच प्रारंभ करणार आहे. कंपनीची आरोग्य क्षेत्रातील एका मोठ्या कंपनीशी चर्चा सुरु असून त्यात ४ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल, असे सांगण्यात येते. ते आणि पिरामल हेल्थकेअर सार्वजनिक क्षेहत्रातील फार्मास्युटिकल्स कंपनी एचएलएल लाईफकेअर लि. (एचएलएल) विकत घेण्यासाठी शर्यतीत आहेत. सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये या कंपनीतील १०० टक्के हिस्सा खासगी कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडे सात बोली प्रारंभी आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in