प्रभू श्री रामाच्या प्रेरणेतूनच सबका साथ, सबका विकास

भगवान राम यांचा राज्याभिषेक केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे राम की पैडीवर पोहोचले.
प्रभू श्री रामाच्या प्रेरणेतूनच सबका साथ, सबका विकास

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात प्रभू रामचंद्रांचा विचार देशाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. प्रभू रामचंद्रांचे शासन व प्रशासन ज्या मूल्यांवर आधारित आहे, त्यातूनच प्रेरणा घेऊन ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ची प्रेरणा मिळाली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

१५ लाख दिव्यांनी अयोध्या नगरी झगमगून गेली. रामलल्लाचे दर्शन, भगवान राम यांचा राज्याभिषेक केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे राम की पैडीवर पोहोचले. तेथे त्यांनी शरयू नदीची पूजा करून आरती केली. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान म्हणाले की, देशात एक वेळ अशी होती की आपल्याच देशात रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळे देशातील धार्मिक स्थळांचा विकास मागे पडला. गेल्या आठ वर्षांत आम्ही धार्मिक स्थळांचा विकास केला. प्रभू रामचंद्र कर्तव्यापासून कधीही विचलीत झाले नाहीत. प्रभू रामचंद्र यांनी सर्वांना एकत्र घेऊन लंकेवर विजय मिळवला. नागरिकांमध्ये देशसेवेचा भाव उत्पन्न होतो तेव्हा देश मोठ्या उंचीवर जातो. आम्हाला आमच्या कर्तव्याप्रती समर्पित होणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in