राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा जारी,मूर्मू विरुद्ध सिन्हा लढत होणार

ओदिशाच्या आदिवासी नेत्या व झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मूर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा जारी,मूर्मू विरुद्ध सिन्हा लढत होणार

केंद्रातील सत्ताधारी भाजप व विरोधी पक्षांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा मंगळवारी केली. भाजपप्रणित रालोआने ओदिशाच्या आदिवासी नेत्या द्रौपदी मूर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली, तर विरोधकांनी ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. आता मूर्मू विरुद्ध सिन्हा अशी लढत होणार आहे.

भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवारी झाली. यात बैठकीत ओदिशाच्या आदिवासी नेत्या व झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मूर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत मूर्मू यांच्या नावाची घोषणा केली. मूर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. त्या या पदावर निवडून आल्यास राष्ट्रपती बनणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील. राष्ट्रपती पदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in