अमित शहा यांच्या दौऱ्या आधी दोन समुदायात झाली दंगल

घटनेमध्ये चार जण जखमी झाले आहेत, ज्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश
अमित शहा यांच्या दौऱ्या आधी दोन समुदायात झाली दंगल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या अवघ्या काही तास आधी गुजरातमधील बोरसाडजवळ दोन समुदायात दंगल घडली आहे. जमिनीच्या वादातून ही भांडणे झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली. या घटनेमध्ये चार जण जखमी झाले आहेत, ज्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. त्यानंतर रबर बुलेट्सच्या ३० फैरीही झाडल्या. हनुमान मंदिराशेजारील जमिनीवरून हा वाद झाला होता. काही जण एकमेकांवर दगडफेक करत होते. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यावर या घटनेचा प्रभाव पडणार नाही, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in