बेटरडॉट कॉमचे सीईओ विशाल गर्ग यांच्या अडचणीत वाढ

कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने सीईओ आणि कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला
बेटरडॉट कॉमचे सीईओ विशाल गर्ग यांच्या अडचणीत वाढ

कोरोना काळात एका घटनेने सर्वांचच लक्ष वेधले होते. झूम कॉलवर ९०० कर्मचाऱ्यांना बेटरडॉट कॉमचे सीईओ विशाल गर्ग यांनी नोकरीवरुन काढून टाकले होते. गर्ग यांच्या निर्णयावर जगभरातून टीका झाली होती. आता त्याच विशाल गर्ग यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत.

कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने सीईओ आणि कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माजी कर्मचाऱ्याने आरोप केला आहे की, कंपनी आणि गर्ग यांनी डिजिटल मॉर्गेज फर्मच्या आर्थिक संभावना आणि कामगिरीबद्दल गुंतवणूकदारांना दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. कंपनीची माजी कर्मचारी सारा पियर्स हिने हा गुन्हा दाखल केला आहे. सारा यांनी सॉफ्टबँक-सपोर्टेड कंपनीमध्ये सेल्स आणि ऑपरेशन्ससाठी व्हाईस प्रेसिडंट म्हणून काम केले आहे.

स्पेशल पर्पज अॅक्विझिशन कंपनीत विलीनीकरण करून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली. हा करार मे २०२१ मध्ये झाला होता, जो अद्याप बंद झालेला नाही. सारा पियर्सने खटल्यात दावा केला की हे मुद्दे मांडल्याबद्दल त्यांना फेब्रुवारीमध्ये कंपनीतून काढून टाकले.

सारा यांनी या प्रकरणात दावा केला आहे की विशाल गर्ग बेटरचे स्टेटमेंट्स चुकीच्या पद्धतीने मांडले. जेणेकरुन आर्थिक स्थितीमुळे गुंतवणूकदारांनी पैसे काढण्याऐवजी एसपीएससी विलीनीकरणास पुढे जाण्याची खात्री मिळेल. या आरोपांवर बेटर डॉट कॉमच्या वकिलांनी सांगितले की, दाव्यात कोणतेही तथ्य नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in