
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात देशभर सुरु असलेली 'भारत जोडो' यात्रा (Bharat Jodo Yatra) ही सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ही यात्रा तेलंगणामधून नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल झाली. हजारो मशाल हाती घेऊन खासदार राहुल गांधी दाखल झाले तेव्हा हजारो कार्यकर्त्ये यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रात त्यांचा हा प्रवास १४ दिवस चालणार आहे.
भारत जोडो यात्रेचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जंगी स्वागत केले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत ५ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यात्रा नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमधून जाणार आहे. यावेळी अनेक कार्यक्रम, सभा आणि चौक सभांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ३७५ किलोमीटरचा प्रवास केला आहे. या यात्रेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्यावतीने आदित्य ठाकरे आणि इतर नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.