गुजरातमध्ये पुन्हा भाजपचे सरकार येणार

गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे गृहराज्य आहे. त्यामुळे या राज्याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे
गुजरातमध्ये पुन्हा भाजपचे सरकार येणार

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून गृहमंत्री अमित शहा हे मैदानात उतरले आहेत. काँग्रेससोबत यंदा ‘आप’चे अरविंद केजरीवाल हे गुजरातमध्ये जोरदार प्रचार करत आहेत; मात्र यंदा पुन्हा गुजरातमध्ये भाजपचेच सरकार येईल, असा अंदाज एबीपी न्यूज-सी वोटरच्या मतदानपूर्व चाचणीत व्यक्त करण्यात आला आहे.

गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे गृहराज्य आहे. त्यामुळे या राज्याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. या राज्यात डिसेंबर २०२२ मध्ये निवडणुका आहेत. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमध्ये काही महिन्यांपासून धडाका लावला आहे. एबीपी-सी वोटरच्या सर्व्हेत भाजपला १८२ जागांवर ४७ टक्के, काँग्रेसला ३२ टक्के तर ‘आप’ला १७ टक्के जागा मिळतील. भाजपला १८२ पैकी १३५ ते १४३ जागा, काँग्रेसला ३६ ते ४४ तर ‘आप’ला दोन जागा मिळतील. तर अन्य पक्षांना दोन जागा मिळू शकतात.

भाजपच्या मताचा टक्का घसरणार

गुजरातमध्ये यंदा भाजपच्या मताचा टक्का घसरणार आहे. २०१७ मध्ये भाजपला ४९ टक्के मते मिळाली होती. त्यात दोन टक्क्यांची घट शक्यता आहे. काँग्रेसची १० टक्के मते कमी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ३१ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

पंतप्रधानांच्या कामावर ६० टक्के जण खूश

या सर्वेक्षणात जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या कामाबाबत प्रश्न विचारण्यात आले. ६० टक्के जणांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. तर २२ टक्के लोकांनी त्यांच्या कामाबाबत असमाधान व्यक्त केले. तर १८ टक्के लोकांनी पंतप्रधानांचे कामकाज हे साधारण असल्याचे सांगितले. गुजरातच्या चार विभागांत ही मतदानपूर्व चाचणी करण्यात आली. २०१७मध्ये गुजरातमध्ये भाजपने ९९ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपला अधिक जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला गेल्या निवडणुकीत ७७ जागा मिळाल्या होत्या. तर यंदा ३० पेक्षा अधिक जागा कमी होताना सर्वेक्षणात दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in