भाजप महाराष्ट्रातील आमदारांना अहमदाबादला हलवणार

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे सरकार अल्पमतात आले तर भाजपला सरकार स्थापन करण्याची सुवर्ण संधी आहे
भाजप महाराष्ट्रातील आमदारांना अहमदाबादला हलवणार

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला जबर हादरा बसला असला तरी आता सत्ताधाऱ्यांकडूनही भाजपचे आमदार फोडले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजपपुढे आपले आमदार एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप महाराष्ट्रातील आपल्या सर्वच १०५ आमदारांना अहमदाबादलगतच्या एका क्लबमध्ये हलवणार आहे. त्यांच्या मुक्कामाची जबाबदारी गुजरात भाजपच्या काही बड्या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे सरकार अल्पमतात आले तर भाजपला सरकार स्थापन करण्याची सुवर्ण संधी आहे. पण, यासाठी प्रथम भाजपला आपले १०५ आमदार सुरक्षित ठेवावे लागतील. यामुळे राज्यातील भाजपच्या सर्वच आमदारांना एकत्र करून विशेष विमानाने अहमदाबाद एअरपोर्ट व तेथून थेट रिसॉर्ट किंवा क्लबमध्ये घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे. तूर्त, भाजपकडून सत्ताधाऱ्यांचे अधिकाधिक आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महाराष्ट्रातील भाजप आमदारांना कुठे ठेवायचे? या मुद्यावर गुजरात व महाराष्ट्रातील भाजप नेत्यांत मंगळवार सकाळपासूनच सातत्याने दूरध्वनीवरुन संवाद सुरू आहे. त्यात अहमदाबादच्या साणंद लगतच्या एका हाय-प्रोफाइल क्लबची निवड करण्यावर मतैक्य झाले. या क्लबचे मालक भाजपचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते आहेत. या क्लबमध्येच भाजपचे आतापर्यंतचे अनेक कार्यक्रम व गुप्त मोहिमांची रणनिती ठरल्याचेही सांगण्यात येते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in