
नवी दिल्ली : ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो व अश्व शर्यतींवर २८ टक्के जीएसटी लावण्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. गेल्याच आठवड्यात जीएसटी परिषदेने या निर्णयाला मंजुरी दिली होती. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने सीजीएसटी, आयजीएसटी कायद्यातील सुधारणांनाही मंजुरी दिली.