ओळखपत्राशिवाय २००० च्या नोटा बदलता येणार? सर्वोच्च न्यायालय म्हणाले...

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती
ओळखपत्राशिवाय २००० च्या नोटा बदलता येणार? सर्वोच्च न्यायालय म्हणाले...

रिक्वेजिशन स्लीप आणि ओळखपत्राशिवाय २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने नागरिकांना दिली आहे. बँकेच्या या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर २००० रुपयांच्या नोटा असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पैसे भरण्याची स्लीप आणि ओळखपत्राशिवाय २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे. पण रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय काळ्या पैशाची नोंद ठेवण्यास अडचणीचा ठरणारा असून रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आली होती. कोर्टाने या याचिकेची दखल घेण्यास नकार दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर नोटा आहेत आणि त्यांनी अजूनही त्या बँकेतून बदलून घेतल्या नाहीत त्यांना दिलासा मिळाला आहे.

रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे या नोटचा आहेत त्यांनी त्या बँकांमधून बदलून घ्यावा, असं आवाहन रिझर्व्ह बँकेने केले होतं. या नोटा बदलण्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. २०१६ साली केलेल्या नोटबंदीत ५०० आणि १००० च्या नोटा एकाच वेळी बंद करण्यात निर्णय घेण्यात आला होता. त्याला पर्याय म्हणून ५०० रुपयांची नवी आणि २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. दरम्यान, २०१८-१९ मध्ये २००० च्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेने बंद केली होती. त्यानंतर या नोटा चलनात अपवादात्मक आढळत होत्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in