चंदीगड : येथील एका औषध कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना चांगले काम केल्याबद्दल १२ कार गिफ्ट दिल्या आहेत, तर ३८ अन्य कर्मचाऱ्यांनाही कार गिफ्ट करण्याचे कंपनीने ठरवले आहे.
मिट्स हेल्थकेअर प्रा. लिमिटेडचे संचालक एम. के. भाटिया यांनी सांगितले की, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त हे गिफ्ट दिले आहे. कंपनीने अतिशय कार्यक्षम कंपन्यांना १२ कार भेट दिल्या आहेत. भविष्यात आणखीन ३८ कर्मचाऱ्यांना कार भेट देण्याचे आम्ही ठरवले आहे. मेहनत, ध्येयवादी वृत्तीने काम करणे व एकनिष्ठता यामुळे कंपनीला यश मिळाले आहे.
कंपनी क्रिटिकल केअर, स्त्री आजारांवरील औषधे, त्वचारोग, हृदय मधुमेहाशी संबंधित औषधे बनवते.कार मिळालेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, कंपनीने भेट दिलेली कार ही सरप्राइज होती, तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले की, मला कंपनीत आठ वर्षे झाली. मी अत्यंत आनंदी आहे.