केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवले; शिवसेना नावही वापरता येणार नाही

निवडणूक आयोगाने शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्यासाठी शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ दिली होती
 केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवले; शिवसेना नावही वापरता येणार नाही

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा अंतरीम निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री जाहीर केला. त्याचबरोबर दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाचा हा निर्णय अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपुरता मर्यादीत असला तरी तो ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. उद्धव ठाकरे या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्यासाठी शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ दिली होती. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने ८०० पानांचे उत्तर निवडणूक आयोगाला सादर केले आहे. हे ८०० पानी उत्तर पक्षातील फुटीबाबतची सविस्तर माहिती देणारे आहे. त्यानंतर शनिवारी शिवसेनेने वकिलांमार्फत निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाबाबत आपला दावा सादर केला.निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटांना पुरावे सादर करण्यासाठी दिलेली मुदत शनिवारी संपली. या मुदतीपूर्वी ठाकरे गटाने आपली कागदपत्रे आयोगाकडे सादर केल्याचे समजते. ही कागदपत्रे तपासून निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री आपला निर्णय जाहीर केला.

आयोगाची चार तास बैठक

शिवसेनेच्या ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला धनुष्यबान चिन्ह बाबत लेखी उत्तर सादर केल्यानंतर निवडणूक आयोग कार्यालयात तब्बल चार तास बैठक झाली. या बैठकीत दोन्ही गटांच्या कागदपत्रांची तपासणी व चर्चा झाली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने रात्री साडेनऊच्या सुमारास आपला निर्णय जाहीर केला. अंधेरी पोट निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या गटाचा उमेदवार नाही मग धनुष्यबाणचिन्ह का मागितले जाते असा मुख्य मुद्दा ठाकरेंनी आयोगाकडे उपस्थित केला होता. भाजपला या निवडणुकीत फायदा व्हावा, यासाठी त्यांच्या इशारावरून धनुष्यबाणाबाबत शिंदे गटाकडून घाई केली जात आहे असा दावा ठाकरे घटाने केला आहे.

गद्दारांचे हे पाप कधीही धुतले जाणार नाही

आम्हाला या निर्णयाने मोठे दुःख झाले आहे हा निर्णय धक्कादायक आणि शिवसैनिकांसाठी फारच क्ल्षदायक आहे. मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी हे धोकादायक आहे.

गद्दारांचे हे पाप कधीही धुतले जाणार नाही. बाळासाहेबांनी कष्टाने उभ्या केलेल्या शिवसेनेची ही अवस्था गदराने केली आहे

-चंद्रकांत खैरे शिवसेनेचे माजी खासदार

आयोगाचा निर्णय मान्य

केंद्रीय निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिला तो दोन्ही घटना बंधनकारक आहे. हा निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल. आता या निर्णयावर आम्हाला चर्चा करावी लागेल आमचे मुख्यमंत्री नेते उपनेते बसून चर्चा करू आणि पुढे काय करावे याबाबतची रणनीती ठरवू.

-भरत गोगावले शिंदे गटाचे आमदार

पुढची तयारी पर्यायी चिन्हाची ठाकरे गट घेणार गदा व शिंदे गट घेणार तलवार?

दोन्ही गटासमोर पुढची लढाई ही पर्यायी चिन्हाची असेल .महत्त्वाचे म्हणजे शिवसेना नाव सुद्धा दोन्ही घटना वापरता येणार नसल्याने या नावाशी साधर्मी असलेले नाव ते निवडू शकता त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आता शिंदे आणि ठाकरे गटाला नवे नाव आणि नवे चिन्ह मिळणार आहे. आता ठाकरे गट गदा आणि शिंदे गटाने तलवारी निशाणी निश्चित केल्याचे समजते.

आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असे नाही

आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकला तसे होत नाही. गाव तुमच्या हातात असला तरी जिंकता तुम्हाला येत नाही मोदी शहा फडवणीस जी तुम्ही जिंकलात ? अभिनंदन ! पण तुम्हाला जिंकू शकत कारण आमच्यातल्याच फितूरांनी साथ दिली अन्यथा तुमच्या ती धमक नक्कीच नव्हती पण आम्ही खडकातूनही पुन्हा उगवू.

-सुषमा अंधारे शिवसेनेचे उपनेत्या

१९८५ ला मिळाले धनुष्यबाण चिन्ह

शिवसेनेने पहिल्यांदा १९६८ साली लढवलेल्या निवडणुकीत धनुष्यबाण या चिन्हाचा वापर केला. त्यानंतर १९७२ ला मनोहर जोशी यांनी ढाल-तलवार या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता नव्हती. त्यामुळे उपलब्ध चिन्हांच्या यादीतील चिन्ह निवडावे लागत होते. त्यामुळे कधी धनुष्यबाण तर कधी रेल्वे इंजिन तर कधी ढाल-तलवार अशी वेगवेगळी चिन्हे शिवसेनेने वापरली. १९८५ ला मात्र शिवसेनेला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले. तेव्हापासून याच चिन्हावर पक्षाने सर्व निवडणुका लढवल्या; मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागले आहे.

नवीन चिन्ह आणि नाव सोमवारपर्यंत निवडा

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह तर गोठवलेच शिवाय शिवसेना हे नावही दोन्ही गटांना वापरता येणार नाही, असे स्पष्ट केले. आयोगाने हा निर्णय जाहीर करताना शिवसेनेच्या दोन्ही गटांना नवीन चिन्ह आणि नाव निवडण्यासाठी सोमवार दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in