Rahul Gandhi : देशातील लोकशाहीवर आक्रमण; कारवाईनंतर पहिल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले राहुल गांधी?

लोकसभा अध्यक्षांनी संसद सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली.
Rahul Gandhi : देशातील लोकशाहीवर आक्रमण; कारवाईनंतर पहिल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले राहुल गांधी?
@ANI

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोदी आडनाव मानहानी प्रकरणी सुरत न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी संसद सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केली. तसेच, त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यानंतर आज राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. ते म्हणाले, "मला कोणीही घाबरवू शकत नाही. देशातील लोकशाहीवर आक्रमण होत आहे." अशी टीका त्यांनी केली.

राहुल गांधी म्हणाले की, "देशामध्ये रोज लोकशाहीवर आक्रमण होत आहेत. गौतम अदानी यांच्या शेल कंपनीत २० हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे नाते काय? मी हेच प्रश्न विचारात आहे. मी या कारवाईमुळे घाबरणारा नाही. मी हे प्रश्न विचारातच राहणार आहे." असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, भाजप लोकांना भटकावण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकादेखील राहुल गांधींनी यावेळी केली. "मी संसदेत आहे की नाही, याने मला फरक पडत नाही. पण मी माफी मागायला सावरकर नाही. मी गांधी आहे, आणि मी माफी मागणार नाही," असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुनर्रुच्चार केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी लोकसभा अध्यक्षांवरही टीका केली. ते म्हणाले, "माझे भाषण संसदेतून काढून टाकण्यात आले. मला संसदेत बोलू दिले जात नाही. सभागृहातील गंभीर कृत्यांबाबत त्यांना वारंवार पत्र लिहूनही त्याची दखल घेतली गेली नाही," तसेच ते पुढे म्हणाले की, "मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे." असेही ते म्हणाले. "माझ्या संसदेतील पुढच्या भाषणाला घाबरून पंतप्रधान मोदींनी माझ्यावर ही कारवाई करण्यास भाग पाडले." असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in