काेराेनाच्या नाकातील लसीला मिळाली मान्यता

कोविडच्या प्रौढ रुग्णांवर उपचार करण्यासाठी भारतात नाकातील स्प्रे लॉन्च केला होता.
काेराेनाच्या नाकातील लसीला मिळाली मान्यता

भारत बायोटेकने कोविड-१९विरुद्ध विकसित केलेल्या नाकातील लसीला भारताच्या औषध नियंत्रकांनी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.

फेब्रुवारीत ग्‍लेनमार्कने सॅनोटाइझ कंपनीच्या सहकार्याने कोविडच्या प्रौढ रुग्णांवर उपचार करण्यासाठी भारतात नाकातील स्प्रे लॉन्च केला होता. भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलकडून उत्पादन आणि विपणन मंजुरी मिळाली आहे. “भारतातील तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या बऱ्यापैकी यशस्वी झाल्या आहेत आणि २४ तासांत व्हायरल लोडमध्ये ९४ टक्के आणि ४८ तासांत ९९ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. भारत बायोटेकच्या इंट्रानेजल व्हॅक्सिनचे नाव बीबीव्ही१५४ आहे. ही लस नाकातून शरीरात जाते. ही लस शरीरात प्रवेश करताच कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण दोन्ही रोखते. या लसीला कोणत्याही इंजेक्शनची आवश्यकता नसल्यामुळे यापासून दुखापत होण्याचा धोका नाही. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणाची गरज भासणार नाही.

बूस्टर डोस म्हणून लस दिली जाईल

ही लस प्राथमिक लस म्हणून दिली जाणार आहे. तथापि, ही कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डसारख्या लसी घेतलेल्यांना बूस्टर डोस म्हणून दिले जाऊ शकते. भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष डॉ. कृष्णा एला यांनी सांगितले की, पोलिओप्रमाणेच या लसीचे चार थेंब पुरेसे आहेत. दोन्ही नाकपुड्यांमध्ये प्रत्येकी दोन थेंब टाकले जातात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in