दिल्ली विधानसभा निवडणूक : ‘आप’ची पहिली यादी जाहीर

दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) गुरुवारी आपली ११ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला असून भाजप आणि काँग्रेसमधून अलीकडेच ‘आप’मध्ये प्रवेश केलेल्या सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक : ‘आप’ची पहिली यादी जाहीर
Published on

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) गुरुवारी आपली ११ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला असून भाजप आणि काँग्रेसमधून अलीकडेच ‘आप’मध्ये प्रवेश केलेल्या सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दिल्ली विधानसभेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार असून उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करणारा ‘आप’ हा पहिला पक्ष आहे. ‘आप’चे निमंत्रक गोपाळ राय म्हणाले की, ११ मतदारसंघांतील आठ मतदारसंघांत पक्षाचा आमदार नाही आणि या आठपैकी सहा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in