सोशल मीडियावर एका व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओत दिल्ली पोलीस कर्मचार्याला एका एसयूव्हीने कारने जोरदार धडक दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. कारने इतकी जोरदार धडक दिली की, पोलीस कर्मचारी त्या धडकेने कारच्या बोनेटवरून खाली पडला आणि ती गाडी धडक देऊन पुढे निघून गेली.
हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. यानंतर पोलिसांनी लगेच त्या कार चालकाची शोधमोहीम सुरु केली. यानंतर पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं आहे.
हा व्हिडीओ दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आला आहे. ही घटना 24-25 ऑक्टोबरला मध्यरात्री घडली आहे. पोलिसांनी त्या कार चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे .या घटनेचा व्हिडीओ दिल्ली पोलीसांकडून जारी करण्यात आला आहे. हा कारचालकाची क्रूरता बघून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.