
"दिल से बुरा लगता है भाई प्लीज भाई" या मीम मुळे चर्चेत आलेला यूट्यूबर देवराज पटेल याचं छत्तीसगडमधील रायपूर येथे एका अपघातात मृत्यू झाला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेल बघेल यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसंच त्यांनी देवराज याला श्रद्धांजली सुद्धा वाहीली आहे. "एवढ्या कमी वयात अतुलनीय प्रतिभेच्या कलाकाराला गमावणे अत्यंत दु:खद आहे. देव त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती" असं ट्विट मुख्यमंत्री भूपेल यांनी केलं आहे.
देवराज पटेल याचा अपघात लाभांडी चौक परिसरात झाल्याच माहिती समोर आली आहे. एका अनियंत्रीत ट्रकने बाईकला टक्कर दिली आणि त्यात देवराज पटेल याला आपला जीव गमवावा लागला आहे. मुख्यमंत्री भूपेल यांनी याबाबतची माहिती देताना ट्विटवर एक व्हडिओ देखील शेअर केला आहे.
देवराजने मृत्यूच्या काही तास आधी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. मिळालेल्या माहितीनुसार देवराज रील शूट करण्यासाठी रायपूर येथे आला होता. परतीच्या वेळी हा अपघात घडून त्यात त्याचा मृत्यू झाला. तो अवघ्या २१ वर्षाचा होता व सध्या कला शाखेच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता. त्याने भुवन बामच्या 'ढिंढोरा' या सीरीजमध्ये सुद्धा काम केलं होतं. त्याचे युट्यूबर १ लाखांहूनअधिक सबस्क्राईबर्स तर ५६ हजाहून जास्त फॉलोवर्स होते.