अपात्र वैमानिकाने केले विमानाचे उड्डाण; DGCA ने एअर इंडियाला ठोठावला ९० लाखांचा दंड

अपात्र वैमानिकाने विमानाचे उड्डाण केल्याबद्दल नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला ९० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : अपात्र वैमानिकाने विमानाचे उड्डाण केल्याबद्दल नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला ९० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इतकेच नव्हे, तर या चुकीबद्दल ‘डीजीसीए’ने एअर इंडियाचे परिचालन संचालक पंकुल माथुर यांना सहा लाख रुपयांचा, तर प्रशिक्षण संचालक मनीष वासवदा यांना तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. संबंधित वैमानिकालाही भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती घडू न देण्याबद्दल ताकीद देण्यात आली आहे, असे ‘डीजीसीए’ने एका प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे.

एअर इंडियाच्या एका विमानाचे उड्डाण करण्यात आले असता त्यामध्ये बिगर प्रशिक्षित लाईन कॅप्टनसोबत नॉनलाईन प्रथम अधिकारीही होता. ‘डीजीसीए’ने याप्रकरणी कडक ताशेरे ओढताना ही गंभीर चूक असल्याचे म्हटले आहे. एअर इंडियाकडून १० जुलै रोजी मिळालेल्या वोलंड्री अहवालाच्या माध्यमातून सदर प्रकरण ‘डीजीसीए’ला समजले.

विमान ऑपरेशनमध्ये अनेक टप्प्यांवर त्रुटी

नियामकाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एअर इंडियाच्या ऑपरेशनचा पूर्ण तपास केला आणि कागदपत्रांचीही तपासणी केली. त्याचप्रमाणे एअर इंडिया शेड्युलिंग स्पॉटही तपासले. त्यानंतर प्रथमदर्शनी अनेक टप्प्यांवर त्रुटी जाणवल्या. काही ‘पोस्ट होल्डर्स’ आणि कर्मचाऱ्यांकडूनही नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in