दिल्लीत हिवाळी सुट्टी एक महिना आधी प्रदूषणामुळे शिक्षण संचालनालयाचा निर्णय

दिल्लीच्या शिक्षण संचालनालयाने बुधवारी एका परिपत्रकाद्वारे हे घोषित केले आहे.
दिल्लीत हिवाळी सुट्टी एक महिना आधी प्रदूषणामुळे शिक्षण संचालनालयाचा निर्णय

नवी दिल्ली : वायू प्रदूषणाच्या चिंताजनक परिस्थितीमुळे राजधानी दिल्लीत डिसेंबर महिन्यात सर्व शाळांना दिल्या जाणारी हिवाळी सुट्टी एक महिना आधीच देऱ्यात आली आहे. यामुळे आता ही सुट्टी ९ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत दिली जाणार आहे. दिल्लीच्या शिक्षण संचालनालयाने बुधवारी एका परिपत्रकाद्वारे हे घोषित केले आहे. यापूर्वी हवेच्या खराब दर्जामुळे ही सुट्टी ३ ते १० नोव्हेंबर अशी घोषित करण्यात आली होती.

दिल्लीतील हवेच्या चिंताजनक दर्जामुळे जीआरएपी-४ च्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि अशा प्रकारच्या वायू प्रदूषणाच्या गंभीर स्थितीबाबत भारतीय हवामान विभागाने सुधारणा होईल, असे सांगितलेले नाही. हिवाळी सुट्टी २०२३-२४ साठी म्हणूनच आधी घेतली जात आहे. त्यामुळे शाळा पूर्ण बंद राहतील तसेच शिक्षक व विद्यार्थी यांना घरी राहता येईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे. दिल्लीचा एअर क्वालिटी निर्देशांक ४२१ नोंदला गेला आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजता तो ३९५ होता, तेथून तो या स्तरावर आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in