आपल्या निवासस्थानी ईडी छापे टाकणार, राहुल गांधी यांचा दावा; ‘ईडी’ अधिकाऱ्यांचे स्वागत करणार

आपल्या निवासस्थानी छापे टाकण्याची तयारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुरू केली असल्याची खात्रीलायक माहिती आपल्याला मिळाली आहे, असा दावा शुक्रवारी गांधी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
आपल्या निवासस्थानी ईडी छापे टाकणार, राहुल गांधी यांचा दावा; ‘ईडी’ अधिकाऱ्यांचे स्वागत करणार
Published on

नवी दिल्ली : लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाभारतातील ‘चक्रव्यूह’चे उदाहरण दिले होते. त्यानंतर आपल्या निवासस्थानी छापे टाकण्याची तयारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुरू केली असल्याची खात्रीलायक माहिती आपल्याला मिळाली आहे, असा दावा शुक्रवारी गांधी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आपण या छाप्यांची प्रतीक्षा करीत असून ईडीच्या अधिकाऱ्यांचे चहा आणि आपले चक्रव्यूह उदाहरण प्रत्येक दोनपैकी एका व्यक्तीला रुचलेले नाही, आपल्या निवासस्थानी छापे टाकण्याची योजना आखण्यात येत आहे, अशी माहिती ईडीतीलच काही जणांनी दिली आहे, त्याची आपण प्रतीक्षा करीत आहोत, या अधिकाऱ्यांचे आपण चहा आणि बिस्कीट देऊन स्वागत करू, असे गांधी म्हणाले.

तपास यंत्रणांचा गैरवापर, काँग्रेसची तहकुबी नोटीस

दरम्यान, भाजप सरकार राजकीय छळासाठी ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाचा गैरवापर करीत आहे. त्याविरुद्ध काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी शुक्रवारी तहकुबीची नोटीसही सादर केली आहे. देशात भीतीचे वातावरण पसरले असून सहा जणांचा एक समूह संपूर्ण देशाला चक्रव्यूहामध्ये अडकवत आहे, मात्र इंडिया आघाडी हा चक्रव्यूह भेदणार असल्याचे आश्वासन आपण देतो, असे गांधी यांनी म्हटले होते. या चक्रव्यूहाला आपण ‘पद्मव्यूह’ही (कमळ- भाजपची निवडणूक निशाणी) म्हणू शकतो, असेही राहुल गांधी म्हणाले होते.

logo
marathi.freepressjournal.in