भारतीय किसान युनियनमध्ये फूट

भारतीय किसान युनियनमध्ये फूट

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत आणि प्रवक्ते राकेश टिकैत वेगळे झाले आहेत. राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेशसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारतीय किसान युनियन (अराजकीय) स्थापन करण्यात आली आहे. राजेश सिंह चौहान स्वतः त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. नरेश टिकैत आणि राकेश टिकैत हे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत एका पक्षाचा प्रचार करण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी केला. राकेश टिकैत हे लखनऊमध्ये राहून फूट टाळण्यासाठी प्रयत्न करत होते; मात्र त्यांना यश आले नाही.

राजेश सिंह चौहान यांनी लखनौ येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, “कार्यकारिणीने निर्णय घेत मूळ भारतीय किसान युनियनच्या जागी भारतीय किसान युनियन (अराजकीय) स्थापन केली आहे. माझ्याकडे संस्थेचा ३३ वर्षांचा इतिहास आहे. १३ महिन्यांच्या आंदोलनानंतर आम्ही घरी आलो, तेव्हा आमचे नेते राकेश टिकैत हे राजकारणाने प्रेरित दिसले. आम्ही त्याच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी म्हटले की, आम्ही अराजकीय लोक आहोत आणि कोणत्याही राजकीय संघटनेत सहभागी नाही. पण आमचे नेते कोणत्यातरी राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली आले आणि त्यांना आम्हाला त्या पक्षाचा प्रचार करण्याचे आदेश दिले. मी विरोध केला; पण त्यांनी माझे ऐकले नाही,” असे राजेश सिंह यांनी सांगितले.

“मी, बीकेयूचा (अराजकीय) अध्यक्ष आहे. आम्ही आंदोलनात सहभागी होतो. आंदोलनातही तितकीच साथ दिली. दानाच्या पैशालाही हात लावला नाही. ३३ वर्षांत भारतातील सर्व चळवळी. खांद्याला खांदा लावून लढले. मी, यापुढे राजकीय पक्षात राहणार नाही,” असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in