फ्लिपकार्ड पे लेटर वापरकर्त्यांची संख्या ६० लाखांवर

फ्लिपकार्ड पे लेटर वापरकर्त्यांची संख्या ६० लाखांवर

फ्लिपकार्ड पे लेटर’ या क्रेडिट सुविधेचा अवलंब करण्याचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. सात महिन्यांत या सुविधेच्या वापरकर्त्यांची संख्या ६० लाखांवर पोहोचली आहे. ‘फ्लिपकार्ट पे लेटर’ ही सुविधा खिशाला परवडणारी आहे तसेच त्यामुळे ग्राहकांना अधिक सहजसोपा आणि सोयीस्कर असा खरेदीचा अनुभव मिळतो.

‘फ्लिपकार्ट पे लेटर’ने ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट प्रोफाइलवर आधारित १ लाखांपर्यंतची क्रेडिटची सोय दिली आहे. ग्राहकांना महिन्यातून कितीही वेळा खरेदी करता येईल आणि ईएमआयच्या माध्यमातून एकूण बिलाची रक्कम ३० दिवसात भरता येईल. यामुळे ग्राहकांना रोख रक्कम अधिक चांगल्या पद्धतीने वापरता येते. कारण या क्रेडिट सुविधेत कोणतीही प्रत्यक्ष कागदपत्रे नाहीत शिवाय झीरो डाऊन पेमेंट आहे. या ३० दिवसांचा कालावधी देणाऱ्या क्रेडिट उत्पादनाचा वापर ग्रोसरी, लाईफस्टाइल, जनरल मर्कंडाइज आणि होम या विभागातील खरेद्यांसाठी वारंवार केला जात आहे. मोबाइल्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि लार्ज अप्लायन्सेस अशा मोठ्या रकमेच्या विभागात प्रदीर्घ काळाच्या ईएमआयचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. या पेमेंट पर्यायात ३० लाखांहून अधिक व्यवहार केले जातात.

फ्लिपकार्टच्या फिनटेक अॅण्ड पेमेंट्स ग्रूपचे प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष धीरज अनेजा म्हणाले, “गरजेच्या वेळेला रोख रकमेची उपलब्धता देत फ्लिपकार्ट पे लेटरने खरेदीची क्षमता वृद्धिंगत करण्यात साह्य केले आहे. येत्या पाच वर्षांत ‘बाय नाऊ पे लेटर’ बाजारपेठ १० पटींनी वाढून ४० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल. बीएनपीएलमधील सोयींचा विचार करून ४५ टक्के ग्राहक क्रेडिट कार्ड असतानाही बीएनपीएलमधून खरेदी करणे पसंत करतात. ही वाढती मागणी लक्षात घेऊन फ्लिपकार्ट पे लेटरने नुकतीच फ्लिपकार्ट आणि मिंत्रावर १ लाख रुपयांपर्यंत क्रेडिट देण्याची सोय उपलब्ध केली आहे. ही सुविधा अधिक वृद्धिंगत करण्याची त्यांची योजना आहे.” ग्राहकांना ऑनलाइन खरेदी करताना अधिक सहजसुंदर अनुभव मिळावा यासाठी फ्लिपकार्ट पे लेटर आपल्या बँकिंग भागीदारांच्या साथीने प्रयत्न करत आहे. बँक आणि वित्तीय संस्थांची अधिकृत क्रेडिट सेवा उपलब्ध नसणाऱ्या मात्र क्रेडिटसाठी पात्र असणाऱ्या अनेक ग्राहकांच्या या गरजा पूर्ण करण्याचा त्यांचा उद्देश आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in