राष्ट्रपती निवडणूकीसाठी जे. पी. नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यावर चर्चेची जबाबदारी

एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल.
राष्ट्रपती निवडणूकीसाठी जे. पी. नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यावर चर्चेची जबाबदारी

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजप एनडीएमधील मित्रपक्षांसोबत चर्चा करणार आहे. त्याशिवाय यूपीएचे मित्रपक्ष आणि अपक्षांसोबतही भाजप चर्चा करणार आहे. या चर्चेची जबाबदारी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून, २१ जुलैला मतमोजणी होणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करायचे असल्यास लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य त्यात सहभागी होतील आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होईल. त्यानंतर नवीन राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा केली जाईल. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. छोट्या-मोठ्या पक्षांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी चुरस सुरू झाली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in