माजी आमदार हर्षवर्धन जाधव

यांना हृदयविकाराचा झटका
माजी आमदार हर्षवर्धन जाधव

नवी दिल्ली : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जाधव हे दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी असताना त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. जाधव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेले हर्षवर्धन जाधव यांनी मार्च महिन्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in