१ जूनपासून बँकिंग नियमांपासून ते सोने खरेदीपर्यंतचे नियम बदलणार

 १ जूनपासून बँकिंग नियमांपासून ते सोने खरेदीपर्यंतचे नियम बदलणार

मे महिना संपायला अवघे चार दिवस उरले आहेत. नवीन महिना सुरू होताच काही छोटे-मोठे बदल पाहायला मिळतात. यावेळी देखील १ जूनपासून बदला होणार आहेत. त्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये बँकिंग नियमांपासून ते सोने खरेदीपर्यंतचे नियम बदलणार आहेत. .

एसबीआयच्या गृहकर्जाच्या दरात वाढ

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार गृहकर्ज १ जूनपासून महाग होणार आहे. एसबीआयने गृहकर्ज बाह्य बेंचमार्क लेंडिंग रेट (ईबीएलआर) ४० बेस पॉइंट्सने वाढवून ७.०५ टक्के केला आहे, तर आरएलएलआर ६.६५ टक्के अधिक सीआरपी असेल. एसबीआयच्या , हे वाढलेले व्याजदर लागू होतील. यापूर्वी, ईबीएलआर ६.६५ टक्के होता, तर रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) ६.२५ टक्के निश्चित करण्यात आला होता.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक शुल्क लागू

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) ने म्हटले आहे की आधार सक्षम पेमेंट सिस्टम (एईपीएस)साठी जारीकर्ता शुल्क लागू करण्यात आले आहे. हे शुल्क १५ जून २०२२पासून लागू होणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारतीय पोस्टची उपकंपनी आहे,

जी पोस्ट विभागाद्वारे शासित आहे. नियमांनुसार, दर महिन्याला पहिले तीन एईपीएस व्यवहार विनामूल्य असतील, ज्यात एईपीएस रोख पैसे काढणे, एईपीएस रोख ठेव आणि एईपीएस मिनी स्टेटमेंट समाविष्ट आहे. मोफत व्यवहारांनंतर, प्रत्येक रोख काढणे किंवा रोख ठेवीवर २० रुपये अधिक जीएसटी लागू होईल, तर मिनी स्टेटमेंट व्यवहारावर ५ रुपये अधिक जीएसटी लागू होईल.

अॅक्सिस बँक बचत

खात्याचे नियम बदलणार

ॲक्सिस बँकेचे बचत खात्याचे नियम १ जूनपासून बदलणार आहेत. हा बदल म्हणजे निम-शहरी आणि ग्रामीण भागातील सुलभ बचत आणि पगार कार्यक्रमांसाठी खात्यातील सरासरी मासिक शिलकीची मर्यादा १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये किंवा रुपये १ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

वाहनांचा महागडा थर्ड पार्टी इन्शुरन्स

१ जूनपासून वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स महाग होणार आहे म्हणजेच तुम्हाला अधिक इन्शुरन्स प्रीमियम भरावा लागेल. हे वाढलेले दर केवळ चारचाकी वाहनांच्याच नव्हे तर दुचाकी वाहनांच्या मालकांनाही लागू होतील. केंद्र सरकारने बुधवारी थर्ड पार्टी मोटर वाहन विम्याच्या प्रीमियम दरात वाढ केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in