सोनियांना श्वसन मार्गात फंगल इन्फेक्शन, राहुल गांधींनी ईडीकडे मागितली सवलत

पुढील चौकशीसाठी येण्याबाबत ईडी सोमवारी राहुल यांना नव्याने समन्स बजावणार आहे
सोनियांना श्वसन मार्गात फंगल इन्फेक्शन, राहुल गांधींनी ईडीकडे मागितली सवलत
ANI

काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या विनंतीवरून ईडीने नॅशनल हेराल्डप्रकरणी त्यांची सुरू असलेली चौकशी तीन दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. गुरुवारच्या सुट्टीनंतर राहुल शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात पोहोचणार होते, मात्र सोनिया गांधींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली. त्यामुळे राहुल यांची आता सोमवारी चौकशी होणार आहे. सोनियांना श्वसनमार्गाच्या खालच्या भागात बुरशीचा संसर्ग झाला आहे, त्यामुळे गुरुवारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. ईडीने राहुल यांना शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले होते. पण आईची प्रकृती बिघडल्याने राहुल यांनी चौकशी पुढे ढकलण्याची विनंती ईडीला केली. ती मान्य करण्यात आली. त्यामुळे पुढील चौकशीसाठी येण्याबाबत ईडी सोमवारी राहुल यांना नव्याने समन्स बजावणार आहे. सोनियांच्या नाकातून रक्तस्त्राव सोनिया गांधी यांना श्वसन मार्गाचा संसर्ग झाला होता. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रामय्या यांनी सांगितले की, कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला, त्यानंतर त्यांना १२ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांच्या श्वसन मार्गाच्या खालच्या भागातही फंगल इन्फेक्शन आढळून आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in