७०,००० सोन्याचा नवा उच्चांक; चांदीची ८२,००० हजारांकडे वाटचाल

एचडीएफसी सिक्युरिटीजमधील कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, परदेशातील बाजारातील तेजीमुळे दिल्लीच्या बाजारात स्पॉट सोन्याची किंमत (२४ कॅरेट) ८५० रुपयांनी वधारुन ७०,०५० रुपये प्रति १० ग्रॅम झाल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्स येथे स्पॉट गोल्ड मागील बंदच्या तुलनेत २२ अमेरिकन डॉलर्सने वाढून २,२९७ डॉलर प्रति औंस झाला.
७०,००० सोन्याचा नवा उच्चांक; चांदीची ८२,००० हजारांकडे वाटचाल

नवी दिल्ली : मजबूत जागतिक संकेतांमुळे गुरुवारी सोन्याचा भाव ८५० रुपयांनी वाढून उच्चांकी ७०,०५० रुपये प्रति १० झाला, असे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. सलग दुसऱ्या दिवशी मौल्यवान धातूंच्या किमतींनी सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. मागील व्यवहारात मौल्यवान धातू ६९,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भावही एक हजार रुपयांनी वाढून ८१,७०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला. मागील सत्रात तो ८०,७०० रुपये प्रति किलो होता.

एचडीएफसी सिक्युरिटीजमधील कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, परदेशातील बाजारातील तेजीमुळे दिल्लीच्या बाजारात स्पॉट सोन्याची किंमत (२४ कॅरेट) ८५० रुपयांनी वधारुन ७०,०५० रुपये प्रति १० ग्रॅम झाल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्स येथे स्पॉट गोल्ड मागील बंदच्या तुलनेत २२ अमेरिकन डॉलर्सने वाढून २,२९७ डॉलर प्रति औंस झाला. फेडरल रिझर्व्ह चेअर जेरोम पॉवेल यांनी या वर्षी व्याजदरात योग्यवेळी कपात केली जाईल, असे सांगितल्याने सोन्याने आणखी एक विक्रम केला. दर कपात कधी होते यावर व्यापारी लक्ष केंद्रित करतात, असे गांधी म्हणाले. चांदी २७.०५ अमेरिकन डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत होती. मागील सत्रात हा दर २६.२५ डॉलर प्रति औंसवर बंद झाला होता.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्चचे वरिष्ठ व्हीपी नवनीत दमानी म्हणाले, औद्योगिक धातूंच्या तेजीमुळे मागणी वाढल्याने चांदीच्या किमतींनीही देशांतर्गत आघाडीवर सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. सततचा भू-राजकीय तणाव, तैवानमधील भूकंपामुळे सुरक्षित गुंतवणुकीला चालना मिळाली, असे दमानी पुढे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in