कोची : इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू असताना भारताने उघडपणे इस्त्रायलला पाठिंबा दिल्यामुळे हमास अतिरेकी संघटना भारताच्या विरोधात गेली आहे. शुक्रवारी केरळच्या मलप्पुरममध्ये सॉलिडेरिटी युवा आंदोलनने आयोजित केलेल्या युवा प्रतिरोध रॅलीत हमासचा नेता खालिद मशेल याने व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित केले. त्याने या रॅलीत बुलडोजर हिंदुत्व आणि रंगभेद यहुदीवाद उखडून फेकण्याच्या घोषणा दिल्या. ही बाब उघड झाल्यानंतर भाजपने कारवाईची मागणी केली आहे.
रॅली आयोजक एकजुटता युवा आंदोलन ही जमात-ए-इस्लामीची यूथ विंग आहे. त्यांनी या रॅलीचे आयोजन केले होते. केरळमधील भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी हमास नेता सहभागी झाल्याने कारवाईची मागणी केली आहे. सॉलिडेरिटी कार्यक्रमात हमास नेता खालिद मशेलची ऑनलाइन उपस्थिती चिंताजनक बाब आहे. कुठे आहेत केरळचे मुख्यमंत्री? केरळ पोलीस? पॅलेस्टाइन बचावच्या नावाखाली हमास ही दहशतवादी संघटना आणि त्यांच्या नेत्यांचा योद्धयासारखा प्रचार केला जातोय. हे मान्य नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन म्हणाले.
आययूएमएलने सुद्धा पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ कोझिकोड येथे एका विशाल रॅलीच आयोजन केले होते. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटच (यूडीएफ) सरकार आहे. आययूएमएल सत्तेत काँग्रेससोबत आहे. हजारो आययूएमएल समर्थकांनी पॅलेस्टाइन एकजुटता मानवाधिकार रॅलीमध्ये सहभाग घेतला. या रॅलीमध्ये काँग्रेस नेते शशी थरुर यांनी इस्रायलवर ७ ऑक्टोबरला झालेला हल्ला दहशतवादी कृत्य होते, असे म्हटले होते. त्यानंतर शशी थरुर यांच्यावर बरीच टीका झाली. त्यानंतर केरळमध्ये मुस्लिमांसाठी काम करणारी संघटना ‘महल एम्पावरमेंट मिशन’ ने (एमईएम) शुक्रवारी शशी थरुर यांना ३० ऑक्टोबरच्या कार्यक्रमातून हटवण्याचा निर्णय घेतला.