'कर्तव्यपथा’च्या रुपाने इतिहासाचे सृजन झाले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी इंडिया गेटसमोरील ‘कर्तव्यपथा’चे उद‌्घाटन केले
'कर्तव्यपथा’च्या रुपाने इतिहासाचे सृजन झाले -  पंतप्रधान नरेंद्र मोदी

ब्रिटिशांच्या गुलामीचे प्रतीक असलेला ‘राजपथ’ आजपासून इतिहास झाला आहे. आता ‘कर्तव्यपथा’च्या रुपाने इतिहासाचे सृजन झाले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी इंडिया गेटसमोरील ‘कर्तव्यपथा’चे उद‌्घाटन केले. त्यापूर्वी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विशाल पुतळ्याचे अनावरण केले. पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात गुलामीचे आणखी एक प्रतीक नाहीसे झाले आहे. त्याबद्दल मी सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो. देशाला आज एक नवीन प्रेरणा मिळाली आहे. नवीन ऊर्जा मिळाली आहे. येणाऱ्या भविष्यातील चित्रात नवीन रंग भरले जात आहेत. इंडिया गेटजवळ आज राष्ट्रनायक नेताजी बोस यांची विशाल मूर्ती स्थापन झाली. गुलामीच्या काळात येथे ब्रिटिश राजसत्तेच्या प्रतिनिधींची प्रतिमा लावली होती. देशाने आज नेताजींची मूर्ती स्थापन करून आधुनिक, सशक्त भारताची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. बोस यांना संपूर्ण जग नेता मानत होते. त्यांच्यात साहस, स्वाभिमान, विचार व दृष्टी होती. स्वातंत्र्यानंतर देश सुभाषचंद्र बोस यांच्या मार्गावर चालला असता तर देश आणखीन मोठा झाला असता. मात्र, स्वातंत्र्यानंतर या महानायकाला आपण विसरून गेलो.

‘कर्तव्यपथा’तून कर्तव्याची प्रेरणा मिळेल. हा एक जिवंत मार्ग आहे. नेताजींची मूर्ती व राष्ट्रीय युद्ध स्मारक हे कर्तव्याची कायम आठवण करून देतील. येथून जाणाऱ्यांना कर्तव्यासाठी प्रेरणा मिळेल, असे मोदी म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in