उत्तर प्रदेशात सपा-रालोद आघाडीला गळती

गेल्या आठवड्यात सपाचे आमदार दारासिंग चौहान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला
उत्तर प्रदेशात सपा-रालोद आघाडीला गळती

लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने इनकमिंगचे धोरण स्वीकारून अन्य राजकीय पक्षांतील नेत्यांना दारे खुली केल्यानंतर लगेचच उत्तर प्रदेशात त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. राज्यातील समाजवादी पार्टी (सपा)- राष्ट्रीय लोक दल (रालोद) आघाडीला सोमवारी गळती लागली असून, त्यातील अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले.

सोमवारी भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांमध्ये २०१९ साली वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या सपा नेत्या शालिनी यादव, २०१९ साली भाजपमधून सपामध्ये गेलेले अन्शुल वर्मा, अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद भूषवलेले साहबसिंग सैनी, सपाचे माजी आमदार सुषमा पटेल, जगदीश सोनकर यांच्यासह रालोदचे आमदार राजपाल सिंग सैनी यांचा समावेश आहे.

या सर्व नेत्यांनी भाजपच्या राज्य कार्यालयात भाजपचे राज्य अध्यक्ष भूपेंद्र चौधरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची ही गेल्या १० दिवसांतील दुसरी वेळ आहे. गेल्या आठवड्यात सपाचे आमदार दारासिंग चौहान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in