भारत-ब्रिटन दरम्यान मुक्त व्यापार मोदी-सुनक द्विपक्षीय चर्चा

दोन्ही देश समृद्ध पृथ्वीसाठी काम करत राहतील
भारत-ब्रिटन दरम्यान मुक्त व्यापार मोदी-सुनक द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी मुक्त व्यापार करारावर काम करण्यासाठी सहमती दर्शवली.

‘भारत मंडपम’ येथे दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. जपानमध्ये ‘जी-७’ शिखर परिषदेनंतर ही दुसरी बैठक आहे. इंग्लंडच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारत-ब्रिटन मुक्त व्यापार कराराची चर्चा झाली. या बैठकीत संरक्षण तंत्रज्ञान, इनोव्हेशन व महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांचे संबंध अधिक घनिष्ठ करण्याबाबत चर्चा केली.

या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वर सांगितले की, भारत-ब्रिटन दरम्यान व्यापारी संबंध अधिक दृढ करून गुंतवणूक वाढवण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देश समृद्ध पृथ्वीसाठी काम करत राहतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in