भारताने केली मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात

भारताने केली मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात

रशिया-युक्रेन युद्धाची परिस्थिती पाहता भारताने मार्चमध्ये १७७ दशलक्ष डॉलर्स तर एप्रिलमध्ये ४७३ दशलक्ष डॉलर्सचा गहू निर्यात केला आहे. त्यामुळे अनेक देशांना दिलासा मिळाला आहे.

युक्रेन, बेलारूस, टर्की, इजिप्त, कझाकस्थान, कुवेत आदी देशांना गव्हाची निर्यात केली. २४ फेब्रुवारी रोजी युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाले. त्यानंतर भारताने मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात केली. यंदा उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाचे उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त झाल्याने भारताने तत्काळ गव्हाची निर्यात बंद केली. गेल्या वर्षभरात गहू व गव्हाच्या पीठाच्या दरात १४ ते २० टक्के वाढ झाली आहे. भारताने निर्यातबंदी लागू केल्याने ‘जी-७’ देशांनी भारत सरकारवर टीका केली. भारताचा गव्हाच्या निर्यातीत १९ वा क्रमांक आहे. २०१९ मध्ये तो ३५ वा, २०१८ व २०१७ मध्ये तो ३६ वा होता. तर गहू निर्यातीत रशिया, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, युक्रेन, ऑस्ट्रेलिया, अर्जेटिना आघाडीवर आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in