किरकोळ महागाईत भारत जगातील पहिल्या १२ देशांमध्ये अव्वल स्थानावर

जगभरातील केंद्रीय बँका महागाई रोखण्यासाठी सातत्याने उपाययोजना करत आहेत.
 किरकोळ महागाईत भारत जगातील पहिल्या १२ देशांमध्ये अव्वल स्थानावर

महागाईच्या आघाडीवर सतत वाढत चाललेल्या आव्हानादरम्यान भारत जगातील पहिल्या १२ देशांमध्ये अव्वल स्थानावर आहे. जूनमध्ये भारतातील किरकोळ चलनवाढ ७ टक्क्यांवर होती, तर १२ प्रमुख देशांमध्ये ती कमी होती. या देशांबद्दल सांगायचे झाले तर सौदी अरेबियामध्ये किरकोळ महागाई दर वार्षिक आधारावर २.३ टक्के, चीनमध्ये २.५ टक्के तर जपानमध्ये हा दर २.५ टक्के इतकाच आहे. स्वित्झर्लंडमध्ये हे प्रमाण ३.४ टक्के आणि इंडोनेशियामध्ये ४.४ टक्के आहे. जगभरातील केंद्रीय बँका महागाई रोखण्यासाठी सातत्याने उपाययोजना करत आहेत. त्यांना व्याजदर वाढवून मागणीवर दबाव आणायचा आहे. असे असले तरी सर्व देशांतील महागाईची पातळी आतापर्यंत त्यांच्या लक्ष्यापेक्षा जास्त राहिली आहे.

व्हेनेझुएलामध्ये सर्वाधिक महागाई

व्हेनेझुएलामध्ये महागाईचा दर सर्वाधिक म्हणजे १६७ टक्के आहे. त्यापाठोपाठ तुर्की ७८.६ टक्के, अर्जेंटिना ६४ टक्के, रशिया १५.९ टक्के आणि पोलंड १५.५ टक्के आहे. ब्राझीलमध्ये ११.९ टक्के आणि स्पेनमध्ये १०.२ टक्के महागाई दर आहे.

अमेरिकेतही महागाई नऊ टक्क्यांहून अधिक

महागाईचा फटका अमेरिकेलाही बसला आहे. तेथे महागाई दर ९.१ टक्के आहे. तर यूकेमध्ये हे प्रमाण ९.४ टक्के आहे. आयर्लंडमध्ये महागाई दर ९.१ टक्के, पोर्तुगाल आणि स्वीडनमध्ये ८.७ टक्के, नेदरलँडमध्ये ८.६ टक्के, युरोझोनमध्ये ८.६ टक्के आणि कॅनडामध्ये ८,१ टक्के आहे. इटली आणि मेक्सिकोमध्ये महागाई ८ टक्के आहे.

सर्वात आनंदी देशातही महागाई सात टक्क्यांवर

सर्वात आनंदी देश मानल्या जाणाऱ्या फिनलंडचा महागाई दर ७.८ टक्के आहे. थायलंडमध्ये महागाईचा दर ७.७ टक्के, जर्मनीमध्ये ७.६ टक्के, दक्षिण आफ्रिकेत ७.४ टक्के आणि न्यूझीलंडमध्ये ७.३ टक्के आहे. या उच्च दरांना सामोरे जाण्यासाठी, अनेक देशांनी या वर्षी मार्चपासून व्याजदरांमध्ये अचानक तीव्र वाढ केली आहे. भारताने मे महिन्यात अचानक दरात ०.५० टक्क्यानी वाढ करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. तर जूनमध्ये बैठकीत ०.४० टक्क्यांनी वाढ झाली होती. गेल्या चार वर्षांत प्रथमच दर वाढवण्यात आले.

अन्य देशातील महागाई दर पुढीलप्रमाणे : तैवान २.३ टक्के, ऑस्ट्रेलिया ५.१ टक्के, सिंगापूर ५.६ टक्के, फ्रान्स ५.८ टक्के, दक्षिण कोरिया ६ टक्के, फिलीपिन्स ६.१ टक्के आणि भारतात ७.०१ टक्के आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in