धावांचा पाठलाग करताना कोहली नाबाद राहिलेले सर्व सामने भारताने जिंकले!

भारताने रविवारी पाकिस्तानवर चार विकेट्स राखून चित्तथरारक विजय मिळविला. या विजयात कोहलीने मोलाचा वाटा उचलला
धावांचा पाठलाग करताना कोहली नाबाद राहिलेले सर्व सामने भारताने जिंकले!

भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली धावांचा पाठलाग करताना नाबाद राहिलेला असतानाचे सर्व सामने भारताने जिंकल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कोहली धावांचा पाठलाग करताना भारताने १८ सामने जिंकले. यामुळे लक्ष्याचा पाठलाग करताना कोहली क्रीजवर असल्यास विजयाची शंभर टक्के हमी असल्याने त्याला चाहत्यांनी ‘चेस मास्टर’ अशी उपाधी दिली आहे.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकप सामन्यात भारताने रविवारी पाकिस्तानवर चार विकेट्स राखून चित्तथरारक विजय मिळविला. या विजयात कोहलीने मोलाचा वाटा उचलला. विराटने ५३ चेंडूंत नाबाद ८२ धावांची खेळी करत तोच ‘चेस मास्टर’ असल्याचे सिद्ध केले. विराटने रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चेस करताना नाबाद राहण्याचा विक्रम कायम राखला आहे.

भारताची प्रथम फलंदाजी असताना कोहलीने ५८ टी-२० सामन्यांमध्ये ३९.३६ च्या सरासरीने एक हजार ८११ धावा केल्या. यादरम्यान त्याने १५ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या. त्याचबरोबर ५१ सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने ७३.४४ च्या सरासरीने एक हजार ९८३ धावा केल्या. त्याने २० वेळा पन्नासहून अधिक धावांची खेळी खेळली. टी-२० क्रिकेटमध्ये कोहलीने ३६ वेळा धावांचा यशस्वी पाठलाग करताना एक हजार ६२१ धावा केल्या. यादरम्यान त्याने १६ अर्धशतकेही झळकाविली. विराटच्या या आकडेवारीवरून त्याला धावांचा पाठलाग करताना अधिक स्फुरण चढत असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in