पात्रता फेरीतच भारतीय पुरुष टेनिसपटू गारद

स्पर्धेच्या पात्रता फेरीला मंगळवारपासून सुरुवात झाली.
पात्रता फेरीतच भारतीय पुरुष टेनिसपटू गारद

येत्या २७ जूनपासून सुरू होणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीतच भारतीय टेनिसपटू युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन गारद झाले. दरम्यान, भारताची तारांकित टेनिसपटू सानिया मिर्झा महिला दुहेरीच्या मुख्य फेरीत पोहोचली आहे.

लंडनमधील ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब येथे वर्षातील तिसऱ्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून यावर्षी २७ जूनपासून सुरू होणारी विम्बल्डन टेनिस स्पर्धा १० जुलैपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेच्या पात्रता फेरीला मंगळवारपासून सुरुवात झाली. भारतीय टेनिसपटू युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन हे पात्रता फेरीततच बाहेर पडले. दोन्ही खेळाडूंनी आपले सामने सरळ सेटमध्ये गमावले. त्यामुळे भारताच्या सर्व आशा आता सानिया मिर्झावर असणार आहेत.

पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात युकी भांबरीला भांबरीला स्पेनच्या बर्नाब झपाटा मिरॅलेस याच्याकडून ५-७, १-६ अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. युकीने सामन्यात चांगली सुरुवात करत पहिल्या सेटमध्ये ५-३ अशी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर मिरॅलेसने शानदार पुनरागमन केले. या पराभवासह भांबरी ग्रँड स्लॅमस्पर्धेतून बाहेर पडला. स्पेनच्या मिरॅलेसने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतदेखील चांगली कामगिरी करत चौथी फेरी गाठली होती. भारताचा दुसरा टेनिसपटू राजकुमार रामनाथनला झेक प्रजासत्ताकच्या विट कोपारिवाशी याच्याकडून सरळ सेटमध्ये ५-७, ४-६ अशा फरकाने पराभूत झाला. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडू दडपणाखाली खेळले. दोघांनीही खूप चुका केल्या, पण शेवटी कोपारिवाने बाजी मारली.

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी विम्बल्डनमध्ये एटीपी गुण न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टेनिसपटू रोहन बोपण्णाने यापूर्वीच स्पर्धेतून माघार घेतली आहे. अशातच भारताचे दोन्ही पुरुष टेनिसपटू पात्रता फेरीत पराभूत झाल्यामुळे पुरुष गटात भारताच्या सर्व आशा मावळल्या आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in