
कोलकाता : देशात काही भागांत मान्सूनने ओढ दिल्याने आधीच भडकलेल्या महागाईच्या आगीत तेल ओतले जाण्याची शक्यता आहे. देशात खरीपाच्या पेरण्या कमी झाल्याने नजीकच्या काळात अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊन महागाई वाढण्याची शक्यता आहे, असे बँक ऑफ बडोदाच्या एका संशोधन अहवालात म्हटले आहे.
पूर्व व ईशान्य भारतात यंदा अत्यंत कमी पाऊस झाला आहे, तर वायव्य भारतात भरपूर पाऊस झाला. कमी पाऊस झाल्याने डाळींचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे महागाई भडकणार आहे.
देशात किरकोळ महागाई तीन महिन्यांत ४.८१ टक्के झाली, तर घाऊक महागाई ४.१२ टक्के नोंदवली गेली.
रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यांच्या पतधोरण समितीची बैठक ८ ते १० ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या बैठकीनंतर धोरणात्मक निर्णय जाहीर होईल.