
इन्फोसिसचे सीईओ व एमडी सलील पारेख यांना पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय कंपनीच्या संचालक मंडळाने घेतला आहे. १ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२७ पर्यंत त्यांची नियुक्ती असेल.
पारेख हे २०१८ मध्ये कंपनीत सीईओ व एमडी म्हणून कंपनीत काम करत आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते कंपनीचे नेतृत्व करत आहेत. यापूर्वी पारेख हे कॅम्पजेमिनी समूहात एक्झिक्युटिव्ह बोर्डाचे सदस्य होते. गेले २५ वर्षे त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. पारेख यांच्याकडे आयटी क्षेत्रात ३० वर्षांचा अनुभव आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने व्यवस्थापन मंडळाच्या सहा जणांना ‘इसॉप’अंतर्गत १,०४,००० समभाग मंजूर केले आहेत. तर दुसऱ्या ८८ वरिष्ठ एक्झिक्युटिव्हना ‘इसॉप’ अंतर्गत ३,७५,७६० समभाग दिले आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीत थांबवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. आयटी उद्योगात कंपनी सोडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.