भारतातील अनेक भागांमध्ये इन्स्टाग्राम झाले डाऊन

भारतातील अनेक भागांमध्ये इन्स्टाग्राम झाले डाऊन

भारतातील अनेक भागांमध्ये इन्स्टाग्राम डाऊनच्या तक्रारी समोर आल्या आहेत. डाऊन डिटेक्टर वेबसाइटनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या आउटेजच्या समस्येचा सामना करत आहे आणि वापरकर्ते अ‍ॅपवर लॉग इन करू शकले नाही. तर ट्विटर आणि इतर प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ आणि फोटो शेअरिंग अ‍ॅप डाऊन झाल्याची तक्रार युजर्सनी केली.

बुधवारी सकाळी ९:४५ वाजल्यापासून इंस्टाग्राम डाऊन होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आणि दुपारी १२.४५ वाजेपर्यंत ३,२२६ तक्रारी दाखल झाल्या. भारतात इन्स्टाग्राम डाऊन असल्याच्या तक्रारी दिल्ली, जयपूर, लखनऊ, मुंबई, बंगळुरू आणि इतर मोठ्या शहरांमधून आल्या. मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर यूजर्स याबाबत सातत्याने तक्रारी करत होते.

डाऊन डिटेक्टरच्या मते, इंस्टाग्राम डाऊन होण्याचे बहुतेक अहवाल अ‍ॅप्सशी संबंधित आहेत. अ‍ॅप वापरकर्त्यांकडून सुमारे ४४ टक्के तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, तर ३९ टक्के सर्व्हर कनेक्शन आणि १७ टक्के वेबसाइट डाऊन झाल्याबद्दलच्या तक्रारी आहेत.

वापरकर्त्यांना अ‍ॅपचा

वापर करताना समस्या

प्लॅटफॉर्म डाऊन असल्याबद्दल ‘मेटा’कडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ‘मेटा’ ही व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मालकी असलेली कंपनी आहे. १०० हून अधिक भारतीय वापरकर्त्यांनी इन्स्टाग्राम डाऊनबद्दल तक्रार केली आहे. बहुतेक वापरकर्त्यांना अ‍ॅपचा वापर करण्यात समस्या येत होत्या.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in