जम्मू काश्मीर मध्ये एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे .किष्टवाड वरून जम्मूकडे जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. ही बस दोडा जिल्ह्यातील असार भागाजवळ २५० मीटर खोल दरीत कोसळली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार , हा भीषण अपघातात २० हुन अधिक प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे . तर अनेक प्रवाशी गंभीर रित्या जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस ताबडतोब दाखल झाले असून इतर शासकीय यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे.