दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात काश्मीर पोलिसांना यश

कुपवाडामधील माच्छिल सेक्टरमधील नियंत्रणरेषेजवळ दोन दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला
दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात काश्मीर पोलिसांना यश

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रणरेषेजवळ घुसखोरीचा डाव उधळण्यात आला. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दल आणि काश्मीर पोलिसांना यश आले. दहशतवाद्यांकडून दोन एके ४७ रायफल्स, दोन पिस्तूल आणि चार ग्रेनेड जप्त करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाडामधील माच्छिल सेक्टरमधील नियंत्रणरेषेजवळ दोन दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली होती. माच्छिल भागातील एलओसी टेकरी नार येथे जवानांचा वेढा घट्ट होताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. त्यांच्याकडून एके ४७ रायफलसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. परिसरातील शोधमोहीम आणखीन तीव्र करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे शनिवारी रात्री दोन परप्रांतीय मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. जखमी मजूर हे बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील आहेत. दोघेही कामावरून परतत असताना त्यांना रस्त्यात अडवून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. या दोघांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in