मणिपूरच्या आदिवासींचे बंदी मोडून कुछ कुछ होता है!

२३ वर्षांनंतर हिंदी सिनेमाच्या खेळांचे आयोजन
मणिपूरच्या आदिवासींचे बंदी मोडून कुछ कुछ होता है!

गुवाहाटी : मणिपूरमधील कुकी-झोमी-हम्र-झो आदिवासी जमातीने तब्बल २३ वर्षांनंतर स्वातंत्र्यदिनी गाजलेले हिंदी सिनेमे पाहून स्वातंत्र्य साजरे केले. चूडाचंदपूरमध्ये चक्क खुल्या मैदानात तयार केलेल्या चित्रपटगृहात त्यांनी हे चित्रपट पाहिले. विशेष बाब म्हणजे २३ वर्षांपूर्वी भारतीयीकरणाचा ठपका ठेवून येथे हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. कुकी जमातीने यंदा ही बंदी मोडून भारतीय सिनेमा पाहून आपले भारताबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे.

देशद्रोही दहशतवादी संघटनांपासून मुक्ती म्हणून आम्ही या सिनेमांच्या खेळांचे आयोजन केले होते, असे हम्र विद्यार्थी संघटनेचे मुख्यालय त्युइथाफायकडून जाहीर करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी या आदिवसींनी १९९८ साली हिट झालेला कुछ कुछ होता है या हिंदी सिनेमाचा खेळ लावला होता. तसेच ७० च्या दशकातील शोले आणि अलिकडचा ‘उरी-द सर्जिकल स्ट्रार्इक’ या सिनेमांचेही खेळ लावण्यात आले होते. त्यासाठी आदिवासींच्या विद्यार्थी संघटनेने आपल्या रेंगाकी येथील मुख्यालयाच्या आवारात तात्पुरते थिएटर उभारले होते.

भारतीय नागरीक म्हणून आपल्याला भारताच्या कुठल्याही भागात तयार झालेल्या कला आणि चित्रपट पाहण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. मणिपूरी संस्कृतीवर आक्रमण होण्याच्या भीतीने दहशतवादी संघटनांनी हिंदी चित्रपटांवर बंदी घातली होती. राज्य सरकारने मात्र या विरोधात अजूनही कारवार्इ केलेली नाही, अशी टिप्पणी लालरेमसंग या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकारी सदस्याने केली आहे.

मेरी कोम मणिपूरमध्ये प्रदर्शित नाही

बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पिअन मेरी कोम यांच्या जीवनावर आधारीत प्रियंका चोप्रा यांचा चित्रपट त्यांच्याच राज्यात अजूनही प्रदर्शित करण्यात आला नाही, हे मोठे दुर्दैव आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in