महाराष्ट्र कर्नाटक वादावर तोडगा निघणार? आज दोन्ही मुख्यमंत्री अमित शहांच्या भेटीला

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादावर होणाऱ्या दिल्लीमधील बैठकीत काय निर्णय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष
महाराष्ट्र कर्नाटक वादावर तोडगा निघणार? आज दोन्ही मुख्यमंत्री अमित शहांच्या भेटीला

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादावर दिल्लीमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित असणार आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर काय निर्णय घेतले जाणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या खटल्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. सीमाभागामध्ये असलेल्या बेळगावमधील गावे ही कर्नाटकची असून अक्कलकोट, सोलापूर, सांगलीतील काही गावे आमच्याकडे येऊ इच्छितात असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर मात्र, महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले होते. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. दोन्ही राज्यांमध्ये भाजपचेच सरकार असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री असे वक्तव्ये कशी करू शकतात? असा सवाल विरोधकांकडून विचारण्यात येत होता. त्यामुळे दिल्लीमध्ये होणाऱ्या या बैठकीमध्ये का होणार? हे लवकरच सर्वांसमोर येईल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in