एकवेळ विषारी सापावर विश्वास ठेवू, पण भाजपवर नाही; ममतांची 'जहरी' टीका

केंद्रीय यंत्रणांसमोर तृणमूल काँग्रेस कधीही झुकणार नाही, ‘बीएसएफ’कडून त्रास दिला जात असेल तर पोलिसांकडे बेलाशक तक्रार करा, असेही ममतांनी कूचबिहारमधील महिलांना सांगितले.
एकवेळ विषारी सापावर विश्वास ठेवू, पण भाजपवर नाही; ममतांची 'जहरी' टीका
Published on

कूचबिहार (पश्चिम बंगाल) : एकवेळ विषारी सापावर विश्वास ठेवता येईल, परंतु भाजपवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही, अशी 'जहरी' टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी भाजपवर केली. लोकसभा निवडणुकीत भाजप आचारसंहितेचे पालन करीत नसल्याचा आरोपही ममता यांनी केला.

कूचबिहार येथील एका जाहीरसभेत ममता पुढे म्हणाल्या की, केंद्रीय तपास यंत्रणा, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) भाजपच्या इशाऱ्यावर काम करीत आहेत. निवडणूक आयोगाने यामध्ये लक्ष घालावे आणि सर्वांना समान संधी मिळेल, असे पाहावे.

तुम्ही एकवेळ विषारी सापावर विश्वास ठेवू शकता, तो पाळू शकता, परंतु तुम्ही भाजपवर कधीही विश्वास ठेवू शकत नाही. भाजप देशाचा विनाश करीत आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

केंद्रीय यंत्रणांसमोर तृणमूल काँग्रेस कधीही झुकणार नाही, ‘बीएसएफ’कडून त्रास दिला जात असेल तर पोलिसांकडे बेलाशक तक्रार करा, असेही ममतांनी कूचबिहारमधील महिलांना सांगितले. एनआयए, आयकर विभाग, बीएसएफ, सीआयएसएफ भाजपसाठी काम करीत आहेत. ‘एक देश, एक पक्ष’ या तत्त्वाचे भाजप पालन करीत आहे, असेही त्या म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in