रेल्वे स्थानकात २० रुपयांत जेवण

जनरल डब्यातील प्रवाशांची सोय होणार
रेल्वे स्थानकात २० रुपयांत जेवण

नवी दिल्ली : रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने विशेष घोषणा केली आहे. या प्रवाशांना अवघ्या २० रुपयांत जेवणाची सोय केली जाईल. सध्या ही योजना प्रायोगिकतत्त्वावर सुरू केली जाणार आहे.

जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवणाची समस्या भेडसावते. त्यामुळे त्यांना चांगले अन्न मिळत नाही. आता २० रुपयांत चांगले जेवण मिळेल. यात सात पुरी, बटाट्याची भाजी व लोणचे असा आहार असेल, तर ५० रुपये देणाऱ्या प्रवाशांना तांदूळ-राजमा किंवा छोले-चावल, कुलचे, छोले-भटुरे, पावभाजी, मसाला डोसा दिला जाणार आहे. हे स्टॉल जनरल डब्याच्या समोर उभारले जातील. त्यामुळे जनरल डब्याच्या प्रवाशांना दूर जावे लागणार नाही. हे अन्न पॅकबंद द्यावे, असे रेल्वेने आयआरसीटीसीला सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in