''आणखी आपआपसात भांडा,'' दिल्ली निकालांवरून जम्मू-काश्मीरचे CM उमर अब्दुल्लांचा केजरीवाल-राहुल गांधींवर निशाणा

''आणखी आपआपसात भांडा आणि एकमेकांना संपवून टाका,'' जम्मू-काश्मीरचे CM उमर अब्दुल्ला यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दिल्ली निवडणूक निकालांचे सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहेत. त्यानंतर जम्मू काश्मीरचे CM ओमर अब्दुल्ला यांनी ही पोस्ट शेअर करत इंडिया आघाडी आणि विशेष करून अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
''आणखी आपआपसात भांडा,'' दिल्ली निकालांवरून जम्मू-काश्मीरचे CM उमर अब्दुल्लांचा केजरीवाल-राहुल गांधीवर निशाणा
''आणखी आपआपसात भांडा,'' दिल्ली निकालांवरून जम्मू-काश्मीरचे CM उमर अब्दुल्लांचा केजरीवाल-राहुल गांधीवर निशाणासोशल मीडिया
Published on

''आणखी आपआपसात भांडा आणि एकमेकांना संपवून टाका,'' जम्मू-काश्मीरचे CM उमर अब्दुल्ला यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दिल्ली निवडणूक निकालांचे सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहेत. भाजपची अनेक जागांवर सरशी होत आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरचे CM ओमर अब्दुल्ला यांनी ही पोस्ट शेअर करत इंडिया आघाडी विशेष करून आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

उमर अब्दुल्ला यांनी एक जीआयएफ इमेज शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले,''और लडो, जी भर के लडो, समाप्त कर दो एक-दुसरे को'', असे म्हणत त्यांनी आप आणि काँग्रेसवर व्यंग केले आहे. त्यांच्या आपआपसातील भांडणांचा फायदा भाजपला मिळत आहे, अशा त्यांच्या पोस्टचा आशय होता.

त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये एक मुनी जी भर कर लडो, समाप्त करदो एक दूसरे को!!! असे म्हणताना दिसत आहेत.

लोकसभेत एकत्र-विधानसभेत स्वतंत्र

लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस यांनी दिल्लीत एकत्रित निवडणूक लढवली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयावर अब्दुल्ला यांनी यापूर्वीही टीका केली होती. यापूर्वी त्यांनी म्हटले होते की इंडिया आघाडीला कोणतेही स्पष्ट नेतृत्व नाही अशा शब्दांत इंडिया आघाडीवर टीका केली होती.

logo
marathi.freepressjournal.in